MEMBER VOICES · FROM OUR ARCHIVEFinding my voice as a Digital Sakhi

Gautama Amit Raut
Chairman · Digital Pad Sakhi · Kandri Vasti, Ramtek
Namaskar, I am Gautama Amit Raut, an ordinary housewife living in Kandri Vasti village. Today, I am recognized in my village as a Digital Pad Sakhi.
Two years ago, my identity was strictly that of an ordinary housewife and farm laborer. But for the past two years, through our beloved MLA Ashishji Jaiswal Saheb, the Sanitary Pad initiative began. And I found a new path to do something in my life, bringing about a transformation.
Earlier, only the people in my neighborhood and vicinity knew me, but through this initiative, people from women to men across all four villages under the entire Kandri Group Gram Panchayat now recognize me as a Digital Sakhi. When I went to women's homes to distribute sanitary pads, I realized how many problems women face in the village. Many women are deprived of various schemes and are unemployed. But now, every month, through the medium of sanitary pads, I provide them with as much information about schemes as possible and help them get the benefits.
This sanitary pad initiative has given me new recognition and also respect and honor. Earlier, I didn't even know how to use a basic mobile phone, but the Digital Sakhi initiative taught me a lot. Now I finally understand that through this medium and the internet, I can distribute sanitary pads to women.
This initiative has provided a new path and direction for every housewife. And this is solely through our beloved MLA Ashishji Jaiswal Saheb.
नमस्कार,
मी गौतमा अमित राऊत, मी कांद्री वस्ती या गावामध्ये राहणारी सर्वसाधारण गृहिणी महिला. आता माझी एक 'डिजिटल पॅड सखी' म्हणून माझ्या गावात ओळख आहे. या अगोदर, दोन वर्षांपूर्वी, मी फक्त आणि फक्त एक गृहिणी व शेतमजुरी करणारी सर्वसाधारण महिला, हीच माझी ओळख होती.
पण दोन वर्षांपासून आपले प्रिय आमदार आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून 'सॅनिटरी पॅड' या संकल्पाला सुरुवात झाली. आणि माझ्या जीवनात नवीन काही करण्याचा मार्ग मिळाला व जीवनात बदल निर्माण झाला. अगोदर मला फक्त माझ्या शेजारील व परिसरातील लोक ओळखायचे, पण या उपक्रमाद्वारे आता संपूर्ण गट ग्रामपंचायत कांद्री अंतर्गत येणाऱ्या चारही गावांतील महिलांपासून ते पुरुषांपर्यंत लोक मला एक 'डिजिटल सखी' म्हणून ओळखतात.
जेव्हा मी प्रत्येक घरी सॅनिटरी पॅड वितरित करण्यास महिलांच्या घरी गेले, तेव्हा मला कळले की महिलांच्या कितीतरी समस्या गावामध्ये आहेत. व त्या महिला कितीतरी योजनांपासून वंचित व बेरोजगार आहेत. पण आता मी प्रत्येक महिन्याला सॅनिटरी पॅडच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जमेल तेवढ्या योजनांची माहिती पोहोचवून त्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून दिला. या सॅनिटरी पॅड उपक्रमाने मला एक नवीन प्रसिद्धी दिली व मान-सन्मान सुद्धा दिला.
या अगोदर मला साधा एक मोबाईल सुद्धा वापरता येत नव्हता, पण डिजिटल सखी या उपक्रमाने मला खूप काही शिकवले. आता कुठे मला समजते की या माध्यमातून मला इंटरनेटद्वारे महिलांपर्यंत सॅनिटरी पॅड वितरित करता येते. या उपक्रमामुळे प्रत्येक गृहिणी महिलांकरिता एक नवीन मार्ग व दिशा मिळाली. आणि हे सर्व फक्त आणि फक्त आपले प्रिय आमदार आशिषजी जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून शक्य झाले आहे.